मद्रदेश
मद्रदेश : उत्तर भारतातील रावी (प्राचीन परूष्णी) व चिनाब (असिक्नी) या नद्यांदरम्यानचा पंजाबातील प्राचीन देश. याच्या विस्ताराविषयी अनेक मते आहेत. काही तज्ञांच्या मते हा झेलम नदीपर्यंत विस्तारला होता. नीलमतपुराणात शतद्रु (सतलज) व विपाशा (बिआस) या नद्यांच्या उत्तरेला ह्या देशाची सरहद्द लागते, असा उल्लेख आहे.